Chinchwad crime News : पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी आत्महत्येच्या दोन घटना

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात आज (सोमवारी, दि. 26) एकाच दिवशी आत्महत्येच्या दोन घटना उघडकीस आला. पहिली घटना पिंपरी तर दुसरी घटना चिंचवड येथे उघडकीस आली.

पहिल्या घटनेत निशा अरूण मोरे (वय 18, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

दुसऱ्या घटनेत मोहम्मद मुसलम शेख (वय 49, रा. चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. शेख यांनी राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. शेख यांनी यापूर्वीही दोनवेळा रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.

चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III