Chinchwad Crime News : पिंपरी, चाकण, हिंजवडी, सांगवीमधून सहा दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. सोमवारी (दि. 19) पिंपरी आणि चाकण पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन आणि हिंजवडी आणि सांगवी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण सहा वाहन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महेंद्र मिढारात लेगडे (वय 41, रा. कृष्णानगर, चिंचवड) आणि काळूराम नामदेव बोराडे (वय 37, रा. मोशी) यांनी त्याच्या दुचाकी चोरीबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लेगडे यांची 15 हजारांची बजाज डिस्कवर दुचाकी (एम एच 14 / सी व्ही 7877) सोमवारी (दि. 19) सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीच या कालावधीत चिंचवड येथील चेतना कॉपसीटर या कंपनीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

तर बोराडे यांची 30 हजारांची दुचाकी (एम एच 14 / ई जे 4918) 16 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी सव्वा पाच या कालावधीत टेल्को कंपनी समोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

चाकण पोलीस ठाण्यात किरण विजयराव चोरपगार (वय 30, रा. वाघजाईनगर, खराबवाडी, ता. खेड) आणि राजू अक्षय ठाकूर (वय 35, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.

चोरपगार यांची 30 हजारांची दुचाकी (एम एच 27 / सी एम 1634) अज्ञात चोरट्यांनी 11 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता म्हाळुंगे गाव कमानीजवळून चोरून नेली आहे. तर ठाकूर यांची 30 हजारांची दुचाकी (एम एच 14 / एच वाय 7310) त्यांच्या घरासमोरून चोरून नेली आहे.

दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्यात बालिया पितिया भेघावत (वय 56, रा. सुसगाव पाटील नगर, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. भेघावत यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 12 / ई आर 9310) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. हा प्रकार 9 ऑक्टोबर रोजी उघडकीस आला आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

सांगवी पोलीस ठाण्यात गिरीधर उत्तमराव पेदाटे (वय 34, रा. पिंपळे निलख) यांनी फिर्याद दिली आहे. पेदाटे यांची 30 हजारांची दुचाकी (एम एच 24 / ए ई 9126) अज्ञात चोरट्यांनी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते अकरा या कालावधीत विशाल नगर, पिंपळे निलख येथील डी पी रोडवरून चोरून नेली.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.