Chinchwad Crime : पत्नीसोबत दारुविक्री करणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

एमपीसी न्यूज – दोन वर्षांसाठी पिंपरी-चिंचवड (Chinchwad Crime) पोलिसांनी तडीपार केलेला गुंड आपल्या पत्नीसोबत दारू विक्रीचा धंदा करत होता. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 12) दुपारी पाच वाजता च-होली खुर्द येथे करण्यात आली. तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो शहराच्या हद्दीत आला.

संभा नागर रजपूत (वय 52 वर्ष, रा. च-होली खुर्द) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या पत्नी विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priyanka Umargekar : बीएमडब्लू कार देऊनही प्रियंकाने ‘या’ कारणासाठी केली आत्महत्या

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड (Chinchwad Crime) पोलिसांनी आरोपी संभा रजपूत याला 29 मार्च 2022 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्यांचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो शहराच्या हद्दीत आला. त्याने आणि त्याच्या पत्नीने गावठी हातभट्टी दारूची विक्री सुरु केली. याबाबत गुन्हे शाखा युनिट तीनला माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करून संभाला अटक केली. त्याची पत्नी लघुशंकेच्या कारणाने पळून गेली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.