Priyanka Umargekar : बीएमडब्लू कार देऊनही प्रियंकाने ‘या’ कारणासाठी केली आत्महत्या

एमपीसी न्यूज : बीएमडब्लू कार देऊनही फर्निचरच्या मागणीचा तगादा लावल्याने आळंदी नगरपालिकेच्या अध्यक्षांच्या सून आणि माजी भाजप नगरसेविका कमल घोलप यांची मुलगी प्रियंका (Priyanka Umargekar) हिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हि माहिती मयत प्रियंका हिच्या वडिलांनी म्हणजेच अनिल उर्फ बापू घोलप यांनी दिली.

प्रियंका उमर्गेकर हिने रविवारी 10 जुलै रोजी आत्महत्या केली. ती अनिल उर्फ बापू घोलप आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी भाजप नगसरसेविका कमल घोलप यांची मुलगी. तिचे लग्न काहीच महिन्यांपूर्वी आळंदी नगरपालिकेच्या अध्यक्ष वैजयंती उमर्गेकर यांच्या मुलासोबत झाले होते. या आत्महत्येसंदर्भात अनिल घोलप यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. या फिर्यादित त्यांनी म्हंटले आहे, कि लग्न झाल्यापासून त्यांच्या मुलीचा राहिलेला हुंडा म्हणजे संसार उपयोगी वस्तू व फर्निचर कधी देणार? यासाठी त्यांच्या मुलीचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. त्यामुळे त्यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे.

Priyanka Umargekar 2

लग्नात घोलप यांनी 45 लाखांची बीएमडब्लू कार दिली होती. उमर्गेकर त्यांच्या घरात आणखी नवीन खोल्या बांधत होते. त्यामुळे घोलप यांनी फर्निचर नवीन खोल्या बांधल्यानंतर देतो असे सांगितले. प्रियंकाच्या सासू सतत त्यांना भांडी व फर्निचर कधी देणार? असे विचारात व टोमणे मारत. त्यामुळे प्रियंका दुःखी होती.

Pune News: पुण्यातील शिवणेपुलावरून तरूण बूडाला

अभिषेक उमर्गेकरचा 9 जुलै रोजी वाढदिवस होता. त्यामुळे घोलप परिवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आळंदीला गेले होते. त्यांनी कपडे व केक नेला होता. पण, जावई अभिषेक त्यांच्याशी नीट बोलला नाही. प्रियंकाने सांगितले, की फर्निचरच्या मागणीबाबत तिचा अभिषेकसोबत वाद झाला. त्यामुळे अनिल घोलप यांनी तिच्या सासऱ्यांना सांगितले, की सुतार पाठवून फर्निचर बनवून देतो. प्रियांकाने 10 जुलै रोजी अनिल घोलप यांना दुपारी बारा वाजता फोन केला. तिने विचारले कामात आहात का? त्यांनी विचारले अर्जंट आहे का? तिने उत्तर दिले नाही व कॉल बंद झाला.

त्यानंतर 1 वाजता फोनवर दोघात बोलणे झाले. त्यावेळी प्रियंका (Priyanka Umargekar) फोनवर रडत असल्याचे घोलप यांनी सांगितले. अभिषेक आणि प्रियंका यांच्यात वाद झाल्याचे तिने सांगितले. यासाठी घोलप यांनी प्रियंकाची समजूत काढली. पती पत्नीत वाद होत असतात. तुला इकडे घरी यायचे तर ये. पण तिने नकार दिला. त्यानंतर कमल घोलप यांनी अडीज दरम्यान फोन केला. पण, प्रियंकाने उचलला नाही. पुन्हा पावणेपाच वाजता फोन केला, तरीही फोन उचलला नसल्याने त्यांना चिंता वाटू लागली. रात्री पावणे नऊ दरम्यान उमर्गेकर यांच्या शेजाऱ्यानी प्रियंका हिने आत्महत्या केल्याचे फोन करून सांगितले.

अनिल घोलप यांनी सांगितले, की ते मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूममधील आहेत. ते 1990 साली निगडी येथे वडिल अभिमान घोलप, आई सखुबाई, भाऊ सुनिल व बहीण मीना यांच्या समवेत वास्तव्यास आले. त्यांचे कुटुंब हातगाडीवर भंगार गोळा करत असे. त्यानंतर त्यांचा विवाह कमल यांच्याशी झाला व त्यांना दोन मुले झाली. मोठा मुलगा करण 1998 मध्ये जन्मला, तर मुलगी प्रियंका 2000 मध्ये जन्मली. खूप मेहेनतीने काम करून त्यांनी भंगार गोळा करण्याच्या कामालाच व्यवसायात रूपांतरित (Priyanka Umargekar) केले. आणि दुकान घेतले. त्यांचा निगडीमध्ये बंगला आहे.

Priyanka Umargekar

करण हा बी.कॉम पूर्ण करून दिल्ली येथे यू.पी.एस.सी.साठी तयारी करत आहे. प्रियंका हिने बीबीए पूर्ण केले होते व तिला एम.बी.ए. करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवणार होते, पण अचानक कोविड महामारी सुरु झाली व ते राहून गेले. अनिल घोलप यांच्या एका नातेवाईकांनी सुचवल्यामुळे आठ महिन्यापूर्वी प्रियंकाचे लग्न आळंदी नगरपरिषदेच्या नगरअध्यक्षा वैजयंती उमर्गेकर यांचे सुपुत्र अभिषेक उमर्गेकर यांच्याशी झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.