Chinchwad: ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाविरोधात सामाजिक संघटनांचे धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज – ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या विरोधात सर्व सामाजिक पुरोगामी संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. थेरगाव येथील डांगे चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निषेध व धरणे आंदोलन करण्यात आले.

संभाजी ब्रिगेड, नागरी हक्क सुरक्षा समिती, छावा युवा मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती भापकर, नागरी हक्क समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, छावाचे धनाजी येळकर पाटील, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, मराठा क्रांती मोर्चाचे जिवन बोराडे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

हे पुस्तक आठ दिवसांत मागे घ्यावे. अन्यथा, महाराष्ट्रात भाजपाचे एकही कार्यालय शिल्लक राहणार नाही असा इशारा धनाजी येळकर पाटील यांनी दिला.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, रशीद सय्यद, सतिश कदम, गौतम दिवे, अक्षय गायकवाड, विनोद घोडके, सुमित डोलारे, आकाश कांबळे, छावाचे राजू पवार, गणेश पवार, नागरी सुरक्षा हक्क समितीचे गिरीश वाघमारे, राजू खैरनार, दिलीप रणपिसे, गिरीधर लड्डा, पराग जाधव, सुनील कांबळे, माजी नगरसेविका जनाबाई जाधव, अपना वतन संघटनेचे हमिद शेख, फारुख शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like