Chakan : सलून दुकान सुरू करण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सलून दुकान सुरू करण्यासाठी पत्नीला माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी केली. पत्नीने काही रक्कम आणून सलून सुरू करून दिले असता पतीने दारू पिऊन बंद केले. तसेच कायदेशीर घटस्फोट न घेता दुसरा विवाह केला. याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील आसकेड बुद्रुक् येथे 24 जून 2005 ते 12 जानेवारी 2020 या कालावधीत घडला.

संजय चिंघु राऊत (वय 39, रा. आसकेड बुद्रुक्, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने फिर्यादी महिलेकडे सलून दुकान सुरू करण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच वारंवार किरकोळ कारणांवरून शिवीगाळ आणि मारहाण केली. फिर्यादी यांनी त्यांच्या एका नातेवाईकाकडून 15 हजार रुपये आणून आरोपीला सलून दुकान सुरू करून दिले. ते दुकान आरोपीने दारू पिऊन बंद केले.

फिर्यादी यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. आरोपी पतीने फिर्यादी महिलेशी कायदेशीर घटस्फोट न घेता 23 डिसेंबर 2019 रोजी आळंदी येथील एका महिलेशी दुसरा विवाह केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.