Chinchwad : चिखलीतील घरकुलांची महापौर जाधव यांच्या हस्ते सोडत

एमपीसी न्यूज – केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. 17 व 19 चिखली येथे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असलेल्या घरकुल प्रकल्पातील चार सोसायटयांच्या इमारती मधील एकूण 168 लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते काढण्यात आली.

चिंचवड येथे झालेल्या संगणकीय सदनिका सोडतीवेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, प्रशासन अधिकारी रविंद्र जाधव, कार्यालयीन अधिक्षक महेंद्र चौधरी, मुख्य लिपिक सुनिल माने, राजेश जाधव, संगणक चालक सुजाता कानडे, लिपिक सुवर्णा केदारी, संकेत लोंढे, महेमुद शेख तसेच घरकुल समन्वयक अशोक हंडीबाग व दर्शन शिरुडे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाभार्थींना आता हक्काचे व स्वत:चे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे. परिसर स्वच्छ ठेवावा. इमारती भोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा व जतन करावे असे महापौर राहुल जाधव म्हणाले. चंद्रकांत इंदलकर यांनी प्रकल्पाची माहिती, घराचा वापर, येणारे देयके व बँकेचे हप्ते वेळेवर भरण्याबाबत मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.