Chinchwad : मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज –  स्वामी विवेकानंद यांच्या 156 व्या जयंतीनिमित्त श्री स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान (शरदनगर, चिंचवड), रोटरी क्लब ऑफ पिंपरी (डिस्ट्रिक्ट 3131) आणि जनसेवा फाउंडेशन आय हॉस्पिटल (रानवडी-आंबी) यांनी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे.

चिंचवड येथील मयूर हॉस्पिटल, महात्मा फुलेनगरला शनिवार (दि.12) रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी एक या वेळेत हे शिबिर होईल. या शिबिरात चाळीस वर्षे वयोगटावरील स्त्री-पुरुषांसाठी नेत्र तपासणी, चाळिशीचा चष्मा वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच लेन्स ( भिंग ) बसवले जाणार असून या सर्व सुविधा मोफत आहेत. नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी श्री स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे यांच्याशी 9850811887 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.