BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी -चिंचवड मल्याळी समाजम (सीएमएस) च्या वतीने येत्या 13 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय भरतनाट्यम आणि मोहिनीअट्‌ट्‌म नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सरचिटणीस टी. पी. विजयन यांनी दिली.

निगडी-प्राधिकरणातील सीएमएस शाळेत 13 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता ही स्पर्धा होणार आहे.वय 10 ते 16 पहिला गट तर 17 च्या पुढील वयातील गटात भरतनाट्यमची निवड चाचणी होईल. तर मोहिनीअट्‌टमची चाचणी सर्वांसाठी खुल्या गटात होईल.

विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तसेच तीन बक्षीस देण्यात येईल. सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी 10 जानेवारीपूर्वी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
.