Chinchwad : पुणे-मुंबई महामार्गावर चार वाहनांचा अपघात; एकजण किरकोळ जखमी

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड येथे चार वाहनांचा (Chinchwad)अपघात झाला. यामध्ये एकजण किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास घडली.

 


याबाबत माहिती अशी की, एक(Chinchwad) टेस्टिंग व्हॅन (एमएच 14/टीसीएफ 947) जुना पुणे मुंबई महामार्गाने जात होती. चिंचवड येथे जयश्री टॉकीजच्या समोर आल्यानंतर वाहतूक संथ गतीने असल्याने व्हॅन चालकाने अचानक ब्रेक लावला. ब्रेक  कंट्रोल न झाल्यामुळे  ही  गाडी काही अंतर पुढे घासत जाऊन  समोरच्या कार (एमएच 12/केजे 9816) वर आदळली.

 

Pimpri : माझी माती माझा देश उपक्रमांतर्गत निगडी येथे अमृत कलश यात्रा

ही कार देखील पुढे सरकली आणि पुढे जाणाऱ्या दुसऱ्या कार (एमएच 14/केएफ 7026)ला धडकली. यामध्ये व्हॅनसह तिनही वाहनांचे मोठे  नुकसान झाले. या घटनेत एकजण किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात रहदारीच्या वेळी झाला असून याअपघातमुळे रात्री उशिरापर्यंत वाहतुक कोंडी सुरू होती. पोलिस ही वाहतुक कोंडी कमी  करत होते .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.