Pimpri : माझी माती माझा देश उपक्रमांतर्गत निगडी येथे अमृत कलश यात्रा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माझी माती माझा देश (Pimpri) उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रा उपक्रम राबविण्यात येणार आहे. रविवारी (दि. 15) सकाळी नऊ ते बारा या कालावधीत भक्ती शक्ती चौक, निगडी येथे हा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते हा उपक्रम संपन्न होणार आहे.

Alandi : भाद्रपद बैल पोळ्या निमित्त मातीची बैल व शारदीय नवरात्रारंभ निमित्त घटस्थापनेच्या वस्तू बाजारपेठेत

खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे,(Pimpri )आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, संग्राम थोपटे, उमा खापरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल.

सकाळी नऊ वाजता भक्ती शक्ती चौक येथे अमृत कलश यात्रा उपक्रम राबविण्यात येईल. त्यानंतर दहा वाजता ‘खमरी मो सिक्कीम’ नौदल अधिकारी रॅलीचे स्वागत होईल. त्यानंतर साडेदहा वाजता देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.