Chinchwad : कपड्याचे दुकान सुरु करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ ; सासरच्या पाचजणांवर गुन्हा दाखल

Harassment of a married woman for bringing money from Maher to start a clothing store; Five of the father-in-law were charged :आरोपी पती गणेश याला वाघोली येथे कपड्यांचे दुकान टाकायचे होते

एमपीसी न्यूज – कपड्याचे दुकान टाकण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये, अशी मागणी करीत तसेच चारित्र्यावर संशय घेऊन एका विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह, सासू, सासरे व नणंद यांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित विवाहित महिलेने मंगळवारी (दि.7) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पती गणेश उत्तम जाधव (वय. 32), सासू अंजना उत्तम जाधव (वय. 60 ), सासरे उत्तम तुकाराम जाधव (वय 65 सर्व रा. वाघेश्वर सोसायटी, लोहगाव रोड, वाघोली), नणंद रेखा दत्ता शेलार (बय.34, रा. सोळू, ता.खेड ) आणि मनिषा निलेश पवार (वय.26, रा. राहु, ता. दौंड, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती गणेश याला वाघोली येथे कपड्याचे दुकान टाकायचे होते.

या दुकानासाठी लागणारा पैसा पत्नीने माहेरून घेऊन यावा यासाठी तो पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करायचा. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ करायचा.

चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.