Chinchwad : ‘सागरमाथा’च्या छायाचित्र प्रदर्शनातून झाली गिर्यारोहणची ओळख

एमपीसी न्यूज – आपल्या शहरातील प्रथितयश अशी क्रीडा संस्था, सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून, संस्थेच्या स्थापनेपासूनचा आजवरचा प्रवास, कामगिरी पिंपरी-चिंचवड शहरातील जनमानसासमोर एक भव्य छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहातील कलादालनात सुरूवात झाली.

या भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांचे हस्ते झाले. यावेळी अरूण बो-हाडे नगरसेवक, सतिश इंगळे, चंद्रकांत तापकीर सामाजिक कार्यकर्ते, नारद गुळवे, गोपी आप्पा धावडे, संतोष फुगे व गिर्यारोहण क्षेत्रातील मान्यवर, आदी उपस्थित होते.

  • सह्याद्रीमधील प्रस्तरारोहण, भटकंती मोहिमा, हिमालयीन गिर्यारोहण मोहिमा तसेच गडकिल्ल्यांचे महत्त्व व दुर्गसंवर्धनाची गरज ओळखून त्याविषयीचा संदेश समाजापर्यंत पोहोचण्यासाठी ‘सागरमाथा’ने राबविलेला हा उपक्रम स्तुत्य आहे, असे महेश लांडगे यांनी यावेळी आपल्या मनोगत व्यक्त केले.

गडकोटाबरोबरच हिमालयीन माऊंटेनिअरिंग मोहिमा, वाईल्ड लाईफ व निसर्गाच्या छायाचित्रांसह विविध सामाजिक उपक्रम यांची सुमारे पाचशेहून अधिक छायाचित्रे लोकांना पाहिली. येत्या 6 आणि 7 जुलै ला चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या कलादालनात हे छायाचित्र प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले होते. विविध वयोगटातील सुमारे 1500 हून अधिक नागरीक हे प्रदर्शन बघण्यासाठी भेट देऊन गेले, अशी माहिती समन्वयक पांडुरंग शिंदे यांनी यावेळी दिली.

  • गिर्यारोहक कै. रमेश गुळवे यांनी संस्थेच्या माध्यमातून सह्याद्रीमधील अनेक अवघड प्रस्तरारोहण मोहिमा, हिमालयातील नामांकित अश्या सुमारे दहाहून अधिक हिमशिखरांवरील पर्वतारोहण मोहिमांचे यशस्वीपणे आयोजन केले. सागरमाथाच्या “मिशन एव्हरेस्ट २०१२” या मोहिमेच्या यशाने शहराच्या नावलौकिकात मोठी भर पडली, असे सतिश इंगळे यांनी गौरवोद्गार काढले.

यावेळी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी केले. संतोष घुले यांनी सूत्रसंचालन केले. आभार समन्वयक प्रशांत नाईकरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like