Chinchwad : शहरातील सर्वात मोठ्या एम्पायर इस्टेट परिसराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष – राजेश अग्रवाल

एमपीसी न्यूज : शहरातील सर्वात मोठी व उच्चभ्रू वसाहत मानला (Chinchwad) जाणारा एम्पायर इस्टेट परिसर प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिला असून परिसरात अनेक सुविधांची वाणवा जाणवत आहे, अशी माहिती समाजसेवक राजेश अग्रवाल यांनी दिली आहे.

त्यांनी याबाबत काही मुद्दे निदर्शनास आणून दिले आहेत ते पुढीलप्रमाणे –

1. एम्पायर इस्टेटमधील दर्शन शाळेजवळ उड्डाणपूलला जोडणाऱ्या दोन्ही जिन्यावर रोजच लोक दारू, गांजा, चरस पिण्यासाठी बसतात. अनेक वेळा पोलिसात सांगून सुद्धा पोलिसांचा या ठिकाणी राऊंड होत नाही. अनेकवेळा सांगून सुद्धा येथे दिवे चालू झालेले नाहीत. हे दोन्ही जिने ब्लाइंड स्पॉट झालेले आहेत. या दोन्ही जिन्यावर सीसीटीव्ही बसवण्याचे कोणतेही नियोजन महानगरपालिकेने केलेले नाहीत. या दोन्ही जिन्यातून जाणे हे महिला व लहान मुलांसाठी अतिशय धोकदायक आहे.

Maval : पाण्याच्या ओहोळात आढळले 15 फुटी अजगर

2. एम्पायर इस्टेटमधील रस्ते महानगरपालिकेने अनेकवेळा खोदले व तेवढ्याच जागेवर थोडेफार डांबर टाकून रस्त्यावरील खड्डे भरले आहेत. त्यामुळे एम्पायर इस्टेटमधील रस्त्यांची चाळण झालेली आहे. या रस्त्यांवर पाणी साचून रहाते, म्हणून अजून डांबरी रस्ता खोदून पाणी गटारीत जाण्यासाठी नाली तयार केली (Chinchwad) आहे. हा संपूर्ण रस्ता एकदाच नीट डांबरी किंवा सिमेंटचा तयार करण्याची गरज आहे.

3. उड्डाण पुलाखालील सुशोभीकरण अतिशय मंद गतीने चालू आहे. त्या ठिकाणी नीट साफसफाई होत नाही. परिणामी हे सुशोभीकरण आहे का? अजून बकाली करण चालले आहे हेच कळत नाही. अनेक वर्ष रेंगाळत चाललेले हे काम त्वरीत पूर्ण करावे.

4. स्मार्ट सिटी अंतर्गत बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरा अजूनही चालू नाहीत ते त्वरीत चालू करून घेण्याची गरज आहे. संबधित लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देवून तातडीने वरील प्रश्न सोडवावे, अशी विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.