Chinchwad : विविध मागण्यांबाबत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मनपा कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशनची ठाण्यात बैठक

एमपीसी न्यूज – विविध मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य मनपा कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशनकडून (Chinchwad) आगामी काळात आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची दिशा जाहीर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या संघटना पदाधिकाऱ्यांची सोमवारी (दि. 16) बैठक होणार आहे. ही बैठक सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत मुनिसिपल लेबर युनियन कार्यालय, ठाणे पश्चिम येथे होणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचे प्रमुख जनरल सेक्रेटरी कॉ. गणेश शिंगे यांनी दिली.

Nigdi : सत्यम ज्वेलर्समध्ये दागिन्यांची खरेदी करून दसऱ्याचा आनंद द्विगुणित करा

बैठकीला महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे (पिंपरी चिंचवड मनपा), कार्याध्यक्ष अशोक जाधव (मुंबई), प्रवक्ते गौतम खरात, मधुकरराव बावस्कर (औरंगाबाद मनपा), कॉम्रेड गणेश शिंगे, शैलेश कांबळे प्रसन्न अजित अवताडे (नांदेड वाघाळा मनपा) अखिल भारतीय सफाई काँग्रेस युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक (मुंबई), के. के. आंधळे, अशोक जानराव, बापूसाहेब सदाफुले (सोलापूर मनपा), कॉ. उदय भट, कॉ. प्रकाश जाधव (पुणे मनपा),

प्रल्हाद कोतवाल (अमरावती), कॉ. अनंत लोखंडे (अहमदनगर मनपा), ज्येष्ठ कामगार नेते रवी राव, मोहन तिवारी, चेतन आंबोणकर, विरपाल भाल (ठाणे मनपा), राजन नलावडे, प्रवीण तंत्रपाळे (नागपूर मनपा), अनिल परब (मीरा भाईंदर मनपा), संजय भोसले (कोल्हापूर मनपा), सतीश चिंडालिया, शरद कांबळे,ॲड. सुरेश ठाकूर, अनिल जाधव, संतोष पवार (पनवेल मनपा), रमेश आगळे (उल्हासनगर मनपा), दीपक राव (भिवंडी निजामपूर मनपा), अंकुश गायकवाड (लातूर मनपा), अभिजीत कुलकर्णी (परभणी मनपा), रामगोपाल मिश्रा (चंद्रपूर मनपा), विठ्ठलराव देवकते, बी. बी. भातकुले (अकोला मनपा), कालिचरण बेद (मालेगाव मनपा) यांसह इतर महानगरपालिकेतील संघटना प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

फेडरेशनच्या चर्चेतील बाबी पुढीलप्रमाणे –

लाड-पागे समितीच्या शिफारशी नुसार वारस हक्काच्या सरसकट नियुक्त्या (Chinchwad) मिळण्यासाठी उच्च न्यायलयचे औरंगाबाद खंडपीठ येथील स्थगिती उठवण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न व्हावेत.

अहमदनगर महानगरपालिकेसह ज्या-ज्या महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये सातवा वेतन आयोग लागू केलेला नाही अशा महानगरपालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा.

ज्या-ज्या महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये सातवा वेतन आयोग लागू केला असेल अशा महानगरपालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम तात्काळ देण्यासाठी कार्यवाही करावी.

राज्यातील महानगरपालिकामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सेवेमध्ये कायम करावे, कंत्राटी कामाची पद्धत बंद करावी.

राज्यातील काही महानगरपालिकातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मिळणारे एलबीटीचे अनुदान अपुरे असून त्या अनुदानावर कर्मचारी अधिकाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही, अशा आर्थिक कमकुवत असलेल्या महानगरपालिकेसह सर्व महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर राज्य सरकारने शंभर टक्के वेतनावर अनुदान द्यावे.

राज्यातील सर्व महानगरपालिकांचा अ, ब, क, ड श्रेणीप्रमाणे अधिकारी कर्मचाऱ्यांचा सर्वसमावेशक पद्धतीने आकृतीबंध लागू करावा.

राज्यातील महानगरपालिकामध्ये सफाईचे काम करणाऱ्या कायम व कंत्राटी कामगारांना मालकी हक्काचे घरे मिळवून द्यावीत.

कर्मचाऱ्यांची नवीन भरती करण्याऐवजी शासनाकडे रिक्त असलेल्या पदावर कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या धोरणाला तीव्र (Chinchwad) विरोध.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.