Chinchwad : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन (Chinchwad) संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. निशा पवार, सरला शिंदे, प्रियंका शहाबादे या सहशिक्षिकांनी महात्मा ज्योतिबा फुले याच्याबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सहशिक्षिका सरला शिंदे यांनी आपल्या भाषणातून “ज्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणे पाप समजलं जायच त्या काळी ज्योतीबांनी आपल्या पत्नी म्हणजेच सावित्रीबाईंना साक्षर करून महिलांना शिक्षण देण्याच काम त्यांनी केलं. सती प्रथा, विधवा विवाह याच्या विरोधात बंड केले. दलितांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली.”

Pune : सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथील रेणुका स्वरूप शाळेस ग्रंथ भेट

विद्ये विना मति गेली, मती विना निती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्याने केले” असा संदेश महात्मा फुलेंनी लोकांना दिला असे सांगितले. महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त निबंध (Chinchwad) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहात निबंध स्पर्धेत भाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका प्रज्ञा शिरोडकर यांनी केले तर ज्योती मॅडम यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.