Chinchwad : अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कामगिरी; दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 41 किलो गांजा पकडला

एमपीसी न्यूज – अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन वेगवेगळ्या (Chinchwad) कारवाया करून 10 लाख 64 हजार रुपयांचा 41 किलो गांजा पकडला आहे. याप्रकरणी भोसरी आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली कारवाई भोसरी गावठाण येथे करण्यात आली. एका व्यक्तीने गांजा साठवून ठेवला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संजय मोहन शिंदे (वय 36, रा. भोसरी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सात लाख 81 हजार 300 रुपये किमतीचा 31 किलो 268 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला आहे. त्याने हा गांजा सुरज झंजाळ याच्याकडून आणला असल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वासुली फाटा येथे करण्यात आली. गांजा विक्रीसाठी एकजण येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सप्ला लाऊन रवींद्र काशीराम राठोड (वय 38, रा. कडूस, ता. खेड. मूळ. रा. अकोला) याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून एक दुचाकी, 10 किलो 104 ग्राम वजनाचा गांजा असा ( Chinchwad)  दोन लाख 82 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याने हा गांजा विकास बाले आणि पठारे (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याकडून आणला असल्याने त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही कारवायांमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 10 लाख 64 हजार 300 रुपये किमतीचा 41 किलो 372 ग्राम गांजा जप्त केला आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, राजन महाडीक, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, संदीप पाटील, मनोज राठोड, मयूर वाडकर, संतोष भालेराव, विजय दौडकर, प्रसाद कलाटे, दादा घस, प्रसाद जंगिलवाड, रणधीर माने, मितेश यादव, सदानंद रुद्राक्षे, अशोक गारगोटे, कपिलेश इगवे, पांडुरंग फुंदे यांनी केली आहे.

Hinjawadi : 15 मिनिटात कामे केली नाही म्हणून पतीने दाबला पतीचा गळा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.