Chinchwad : चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी पादचा-याला चाकूचा धाक दाखवून मोबाईल फोन आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 28) रात्री साडेअकराच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथे घडली. घाबरलेल्या तरुणाने याप्रकरणी गुरुवारी (दि. 3) पोलिसात तक्रार दिली.

अमोल अजित विश्वास (वय 23, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 28) रात्री साडेअकराच्या सुमारास वाल्हेकरवाडी मधील मार्तंड मल्हार हॉटेलच्या पाठीमागून रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी पाठीमागून एका मोटारसायकलवरून तीन जण आले. त्यांनी अमोल यांना चाकूचा धाक दाखवला. अमोल यांच्या खिशातून मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 9 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेनंतर अमोल घाबरले असल्यामुळे त्यांनी गुरुवारी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.