Dighi : भरदिवसा घरफोडी ; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – घराचे लॉक तोडून घरात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गजानन महाराज मंदिराजवळ दिघी येथे गुरुवारी (दि. 3) सकाळी अकरा ते दुपारी दोनच्या सुमारास घडली.

संतोष भीमराव कुलकर्णी (वय 37, रा. शिवतीर्थ बिल्डिंग, गजानन महाराज मंदिराजवळ, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद संतोष त्यांच्या फ्लॅटला कुलूप लावून कामानिमित्त सकाळी अकरा वाजता बाहेर गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज त्याने चोरून नेला. संतोष दुपारी सव्वादोन वाजता घरी परत आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस उपनिरीक्षक कदम तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.