Chinchwad : भोसरी परिसरातील सराईत गुन्हेगार सनी गुप्ता टोळीवर मोक्का; अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांचा आदेश

एमपीसी न्यूज – भोसरी परिसरातील सराईत गुन्हेगार सनी गुप्ता याच्या टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाई केली. याबाबतचे आदेश आज (मंगळवारी) अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिले.

टोळीप्रमुख सनी ऊर्फ सँडी कन्हैयालाल गुप्ता (वय 24, रा. मोशी), गुरुदत्त ऊर्फ बाबा अशोक पांडे (वय 32, रा. भोसरी), शशिकांत कन्हैयालाल गुप्ता (वय 20, रा. मोशी), विकास शामलाल जैसवाल (वय 18, रा. भोसरी), शिवाजी किसन खरात (वय 23, रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भोसरी परिसरात वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून गुन्हे करत होते. यामुळे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक होते. याबाबतचा प्रस्ताव भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण यांनी पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्यामार्फत सादर करण्यात आला. हा प्रस्ताव पारित करण्यात आला असून सनी गुप्ता टोळीवर मोक्काची कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिले.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव, सहाय्यक आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण, पोलीस कर्मचारी सचिन चव्हाण, अनिकेत पाटोळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.