Chinchwad News: एमपीसी न्यूज गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्यांना ‘दिलीप सोनिगरा ज्वेलर्स’कडून चांदीचे नाणे प्रदान

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाचा उत्साह वाढविण्यासाठी, पिंपरी चिंचवड शहरातील पहिले न्यूज पोर्टल ‘एमपीसी न्यूज’ने ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली होती. विविध ठिकाणावरून नागरिकांचा या ऑनलाईन स्पर्धेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील सहा विजेत्यांना प्रसिद्ध ‘दिलीप सोनिगरा ज्वेलर्स’ यांच्या कडून चांदीचे नाणं बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आले.

शीतल आंबळे (चिखली), तृप्ती व्यवहारे (चौधरी पार्क, वाकड), आभास दाणी (इयत्ता तिसरीचा विद्यार्थी, निगडी, प्राधिकरण), एकता म्हस्के (भोसरी), गजानन खुळे (रहाटणी) आणि विनीत तिकोने (तापकीर नगर, काळेवाडी) या ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्यांनी ही चांदीची नाणी जिंकली.

तृप्ती व्यवहारे
शीतल आंबळे

गजानन खुळे
विनित तिकोने
आभास दाणी

सलग दुस-या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते, त्यामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याची सूचना प्रशासनाने दिली होती. ‘एमपीसी न्यूज’ने गणेशभक्तांसाठी ऑनलाईन गणेशोत्सव संकल्पना राबवली. यामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला, प्राप्त फोटो पैकी उत्कृष्ट फोटो एमपीसीच्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आले.

या ऑनलाईन स्पर्धेचे प्रायोजकत्व शहरातील प्रसिद्ध ‘दिलीप सोनिगरा ज्वेलर्स’ यांनी स्वीकारले होते. या स्पर्धेतून निवडल्या गेलेल्या सहा अंतिम विजेत्यांना दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांच्या मार्फत चांदीचे नाणं दिले गेले.

स्पर्धेचे परीक्षण स्मिता जोशी व अनुप घुंगुर्डे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.