Chinchwad News: शहर परिसरात चोरीच्या आठ घटना; सहा लाखांचा मुद्देमाल चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चिखली, चाकण, तळेगाव एमआयडीसी, सांगवी, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी सहा लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी शनिवारी (दि. 20) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहारात चोरट्यांचा सुळसुळाट सुटला आहे. चिखली येथे एका घरफोडीच्या घटनेत चोरट्यांनी चार लाख 57 हजार 700 रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. चाकण येथे एका ज्वेलर्स शॉप मधून एका महिलेने दुकानातील कामगाराची नजर चुकवून 35 हजारांचे ब्रेसलेट चोरून नेले.

चाकण परिसरात आणखी तीन चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यातील एका घटनेत मोबाईल फोन आणि कागदपत्रे तर दोन घटनांमध्ये दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वराळे गावातून अज्ञात चोरट्यांनी एका घरात चोरी केली. घरातून 40 हजार 600 रुपये किमतीची रोख रक्कम आणि मोबाईल फोन चोरून नेले आहेत. सांगवी मधून 15 हजारांची तर वाकड मधून 35 हजारांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली आहे. या आठ घटनांमध्ये एकूण सहा लाख तीन हजार 300 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.