Chinchwad News : ‘दार उघड उध्दवा, दार उघड’ ; मोरया गोसावी मंदिरासमोर भाजपचे घंटानाद आंदोलन

भाजपाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वात हे ‘घंटानाद आंदोलन’ करण्यात आले.

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रासह पिंपरी चिंचवड शहरातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळ, मंदिरं, देवस्थान, गुरूद्वारा, बुद्धविहार, जैन स्थानक भाविकांसाठी खुले करावीत या मागणीसाठी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोरया गोसावी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

भाजपाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वात हे ‘घंटानाद आंदोलन’ करण्यात आले. शहर सरचिटणीस व स्थानिक नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी या आंदोलनांचे आयोजन केले होते.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात, नगरसेवक व सरचिटणीस राजाभाऊ दुर्गे, चिंचवड-किवळे मंडलाचे अध्यक्ष योगेश चिंचवडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, सांस्कृतीक आघाडीचे अध्यक्ष धनंजय शाळिग्राम आदि उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

आंदोलनाला पाठिंबा देण्याकरीता चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वप्निल महाराज देव, वरद देव, व्यापारी संघटनेच्यावतीने दिपक सिमंत पेढेवाले आदी सहभागी झाले होते.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरातील मंदिरे व धार्मिक स्थळे साधरणपणे मागील चार महिन्यांपासून बंद आहेत. मात्र काही राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे सुरू झाली आहेत.

पण अद्यापपर्यंत महाराष्ट्रातील मंदिरे, धार्मिक स्थळे सुरू होत नसल्याने, आज राज्यभर भाजपाच्यावतीने राज्य सरकारविरोधात आंदोलनं केली जात आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी घंटनाद करत राज्यसरकारचा निषेध नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.