Chinchwad News : विविध क्षेत्रातील महिलांचा राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सत्कार

एमपीसी न्यूज: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सांगवी शाखेतर्फे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड विधानसभेतील विविध महिलांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील या कर्तृत्ववान महिलांना ‘जिजाऊ गौरव पुरस्कार 2021’ देऊन सन्मानित करण्यात आले.

मनसेचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विजया आंबेडकर, सुधा खोले, वैष्णवी बानुबाकोडे, मनीषा पाटील, कविता आल्हाट, मनीषा जाधव व लीना बालिन यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय हॉकी कोच श्रीधर तंबा यांना क्रीडा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्रसंगी जनहित कक्ष, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष किशोर शिंदे, मनसेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला सेनेच्या अध्यक्षा अश्विनी बांगर, पिंपरी विधानसभा शहर उपाध्यक्ष बाळा दानवले, सचिव रुपेश पटेकर, चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयुर चिंचवडे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत डांगे, जनहित कक्ष, पिंपरी चिंचवड अध्यक्ष राजू भालेराव, वाहतुक सेना अध्यक्ष सुशांत साळवी, विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर तसेच सीमा बेलापुरकर, अनिता पांचाळ, संगिता देशमुख, मनसे सांगवी शाखेचे सुरेश सकट, मंगेश भालेकर, रुस्तम इराणी, गणेश माने, निखिल कदम, कुणाल सोनवणे, महेश केदारी, आनंद भुजंग, अनिल भुजबळ, प्रदीप गायकवाड व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.