Chinchwad crime News : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 128 जणांवर खटले

एमपीसी न्यूज – टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि. 24) शहरातील 128 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत.

गुरुवारी पिंपरी चिंचवड शहरात 784 नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले. यामुळे शहरात आजवर कोरोना बाधितांचा आकडा 73 हजार 260 एवढा झाला आहे. जवळपास पाऊण लाखाच्या घरात हा आकडा गेला असून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.

गुरुवारी एकाच दिवसात तब्बल 30 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे तसेच नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. नियम न पळणा-यांवर पोलिसांकडून कारवाई करत खटले दाखल केले जात आहेत. गुरुवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (4), भोसरी (3), पिंपरी (10), चिंचवड (11), निगडी (7), आळंदी (13), चाकण (1), दिघी (8), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (16), वाकड (16), हिंजवडी (20), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (2), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (14), रावेत चौकी (3), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.