Chinchwad: प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

Chinchwad: Pratibha Junior College's success in Class XII examination कॉलेजचा बारावीचा निकाल 98.60 टक्के निकाल लागला आहे.

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. कॉलेजचा बारावीचा निकाल 98.60 टक्के निकाल लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

शाखानिहाय निकाल पुढीलप्रमाणे
विज्ञान शाखा-
प्रथम- पियुष राहुल बोरा 91.85 टक्के, द्वितीय- बेग मैमूना मिराज अक्खतर 90.15 टक्के, तृतीय- कौशल सुरेंद्र रानडे 89.23 टक्के.

वाणिज्य शाखा-
प्रथम- अनंता अनिमेश भट्टाचार्यजी 91.38 टक्के, द्वितीय- दर्शी मनोज सायनी 89.23 टक्के, तृतीय- रितिका राजू कुरलप 88.31 टक्के

कला शाखा-
प्रथम- रुचिता अशोक कलाल 89.69 टक्के, द्वितीय- मोहिनी अनिल गुप्ता 82.92 टक्के, तृतीय- श्रद्धा उमेश सरोलकर 82.00 टक्के. विशेष यश मिळवून या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये बाजी मारली.

त्याचबरोबर गणित विषयात अथर्व प्रवीण कुऱ्हाडे याला 100 पैकी 100 गुण आणि अनंता भट्टाचार्यजी हिला जर्मन विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले. अथर्व कुऱ्हाडे व अनंता भट्टाचार्यजी या दोन विद्यार्थ्यांनी अनुक्रमे गणित व जर्मन या विषयात पुणे विभागातून प्रथम येण्याचा मान मिळवला.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्रशासन अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.