Chinchwad : भेसळयुक्त पनीर तयार करणा-या कारखान्यावर छापा; 546 किलो भेसळयुक्त पनीर जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या (Chinchwad)खंडणी विरोधी पथकाने चिंचवड मधील महाराष्ट्र मिल्क डेअरी या भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 546 किलो भेसळयुक्त पनीर तसेच पनीर बनविण्याचे इतर साहित्य जप्त केले आहे. यात सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

साजीद मुस्तफा शेख (वय 32, रा. पडवळनगर थेरगाव पुणे), जावेद मुस्तफा शेख (वय 38), कामगार राकेश श्रीबुध्दराम सिंग (वय 26), अल्ताफ हजरतद्दीन शेख (वय 27), अभिषेककुमार योगेशबाबु यादव (वय 22), सर्फराज शराफतउल्ला शेख (वय 35, रा. चित्तराव गणपी मंदीरा जवळ चिंचवड पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Today’s Horoscope 11 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार प्रदीप गोडांबे व पोलीस नाईक आशिष बोटके यांना मिळालेल्या बातमीवरून, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह चित्तराव गणपी मंदीरा जवळ, चिंचवड येथे असलेल्या महाराष्ट्र मिल्क डेअरीवर छापा मारण्यात आला.

यात भेसळयुक्त पनीर तयार करण्याकरीता वापरत असलेले 14 हजार रुपये किंमतीचे 140 लिटर अॅसेटीक अॅसीड, सहा हजार 320 रुपये किंमतीचे 60 लिटर आरबीडी पामोलीन तेल, चार हजार 500 रुपये किंमतीचे 25 किलो ग्लिसरील मोनो स्टीयरेट, तीन लाख 32 हजार 500 रुपये किंमतीची 875 किलो (Chinchwad) स्किम्ड मिल्क पावडर, एक लाख नऊ हजार 200 रुपये किंमतीचे 546 किलो भेसळयुक्त तयार पनीर असा एकूण चार लाख 66 हजार 520 रुपये किंमतीचा मुद्देमाल अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी यांनी जप्त केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहायक पोलीस उप-निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, विजय नलगे, चंद्रकांत जाधव, किरण काटकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.