Pune : आर्थिक पाठबळ नसल्याने नवउद्योजकांना अपयश : डॉ. दीपक करंदीकर

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम : डॉ. दीपक शिकारपूर यांचा विशेष सत्कार

एमपीसी न्यूज : छोट्या उद्योजकांनी तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केल्यास त्यांना उद्योगात गती मिळू शकते. देशात कुठल्याही क्षेत्रात  उद्योग सुरू करण्यासाठी उत्तम संधी उपलब्ध आहेत. (Pune) आर्थिक पाठबळ नसल्याने नवउद्योजकांना अपयश येत असल्याचे ज्येष्ठ उद्योजक, मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष डॉ. दीपक करंदीकर यांनी सांगितले.

मराठी विज्ञान परिषद, पुणे, द इंन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) पुणे लोकल सेंटर व रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. करंदीकर बोलत होते. गेली 36 वर्षे सातत्याने विज्ञानाचा मराठीतून प्रसार तसेच मराठी व इंग्रजी भाषेत 50 पुस्तकांचे लेखन केल्याबद्दल माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, डिजिटल साक्षरता प्रसारक, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांचा सत्कार करण्यात आला. द इंन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) पुणे लोकल सेंटर येथे आज (दि.10) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ उद्योजक, मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष डॉ. दीपक करंदीकर (Pune) आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ, संशोधक व आयसरचे चेअरपर्सन प्रा. डॉ. अरविंद नातू, द इंन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) पुणे लोकल सेंटरचे अध्यक्ष डॉ. संजय झोपे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रकुमार सराफ, कार्यवाह संजीव अत्रे, ज्योत्स्ना सराफ व्यासपीठावर होते.

Chinchwad : भेसळयुक्त पनीर तयार करणा-या कारखान्यावर छापा; 546 किलो भेसळयुक्त पनीर जप्त

औषध निर्माण क्षेत्रातील संधींविषयी बोलताना डॉ. नातू म्हणाले, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील निकष औषध निर्माण क्षेत्रात लागू होत नाहीत कारण हे क्षेत्र मानवी शरीर शास्त्राशी निगडित आहे. (Pune) दुष्परिणामविरहित तसेच मानवी शरीरातील घटकांचा वापर करून औषध निर्मिती करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. वैद्यकीय क्षेत्रातही दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून नॅनो टेक्नॉलॉजीने औषधी शास्त्रात क्रांती घडली आहे तसेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सनेही या क्षेत्रात प्रवेश केला आहे.

नव तंत्रज्ञान आत्मसात करणे, तंत्रज्ञानात सकारात्मक मूल्ये आणणे, स्वत:मध्ये काळानुरूप बदल घडविणे, तंत्रज्ञानाकडे सजग दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. शिक्षणपद्धतीत जोपर्यंत अमूलाग्र बदल होत नाहीत तो पर्यंत देश विकसित होणार नाही, असे असे डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.