IPL 2023 : दिल्ली संघाला 27 धावांनी पराभूत करत चेन्नई विजयासह अंकतालिकेत आले द्वितीय स्थानावर

अष्टपैलू कामगिरी करणारा जडेजा ठरला सामनावीर.

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) तुलनेने कमकुवत असलेल्या (IPL 2023) दिल्ली कॅपिटल्सला 27 धावांनी पराभूत करत चेन्नईने मोठ्या विजयासह प्ले ऑफच्या आशा आणखीनच मजबूत केल्या आहेत.

चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर झालेल्या आजच्या आयपीएल सीझन 16 व्या मधल्या 55 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 167 धावा केल्या,ज्याचा पाठलाग करण्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला सपशेल अपयश आले आणि त्यांना तब्बल 27 धावांच्या फरकाने पराभव स्विकारावा लागला.या विजयाने चेन्नईच्या प्ले ऑफच्या आशा आणखीनच पल्लवित झाल्या आहेत तर याचवेळी दिल्ली कॅपिटल्सच्या पदरी आणखीनच निराशा पडली आहे.या विजयासह चेन्नई सुपर किंग्ज 15 अंकासह दुसऱ्या क्रमांकावरही दिमाखात(IPL 2023)विराजमान झाला आहे.

आज चेन्नईच्या डावाची सुरुवात धडाकेबाज झाली असली तरी ती फार वेळ टिकली नाही, संघाच्या केवळ 32 धावा झाल्या असतानाच या हंगामात धडाकेबाज फलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणारा कॉन्व्हे आज मात्र केवळ 10 धावा करुन अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत होवून तंबूत परतला तर यानंतर अगदी थोड्याच वेळात दुसरा सलामीवीर ऋतूराजही अक्षरच्याच गोलंदाजीवर वैयक्तिक 24 धावा काढून झेलबाद झाला,यावेळी चेन्नईची धावसंख्या 7व्या षटकात 2 बाद 49अशी होती.

या धावसंख्येत थोडीशी भर घालून आधी मोईन खान आणि नंतर अजिंक्य रहाणेही बाद झाले आणि चेन्नईची अवस्था 4 बाद 77 अशी बिकट झाली होती.या कठीण परिस्थितीत अंबाती रायडू आणि शिवम दुबे एकत्र आले आणि त्यांनी 5 व्या गड्यासाठी 43 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करुन डाव बऱ्यापैकी सावरला. (IPL 2023) ही जोडी चेन्नईच्या डावाला आकार देईल असे वाटत असतानाच आधी दुबे अन मग रायडू बाद झाला अन चेन्नई आज चांगलेच अडचणीत येणार असे वाटायला लागले,कारण रायडू बाद झाला तेंव्हा त्यांच्या 16.2 षटकात 6 बाद 126 धावाच झाल्या होत्या, मात्र यानंतरच्या 25 चेंडु अनुभवी धोनी अन जडेजा यांनी शानदार फलंदाजी करत संघाला 167 ची बर्यापैकी लढण्याजोगी धावसंख्या गाठून दिली.जडेजाने 21 तर धोनीने 20 तडाखेबंद धावा चोपत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून देण्यात मोठा वाटा उचलला.चेन्नई कडून शिवम दुबेने सर्वाधिक 25 धावा काढल्या,तर दिल्लीसाठी मिशेल मार्शने सर्वाधिक 3 तर अक्षय पटेलने दोन बळी(IPL 2023) मिळवले.

 

PMC : फुरसुंगी आणि उरुळी देवाची स्वतंत्र नगरपरिषदेच्या 6000 हरकतीवर सोमवारपासून सुनावणी

120 चेंडूत 168 धावांचा पाठलाग करताना दिल्ली संघाची सुरुवात चांगली व्हायला हवी होती ,मात्र तसे न होता ती अतिशय खराब झाली,कर्णधार डेविड वॉर्नर डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर अजिंक्य रहाणेच्या हाती झेल देवून दीपक चाहरच्या गोलंदाजीवर भोपळा ही न फोडताच तंबूत परतला, या धक्क्यातून सावरण्याआधीच फिलिप सॉल्ट आणि मिशेल मार्शही किरकोळ धावा करुन तंबूत परतले आणि दिल्लीची अवस्था 3 बाद 25 अशी बिकट झाली. यानंतर मात्र मनीष पांडे आणि रिले रोसू ही जोडी मैदानावर घट्ट पाय रोवून उभी राहिली अन त्यांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा धीटपणे सामना करत चौथ्या गडयासाठी 59 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करुन संघाला पुन्हा एकदा विजयाची आस दाखवली.

ही जोडी स्थिरावलीय असे वाटत असतानाच आधी मनीष पांडे अन मग त्याच्या पाठोपाठ रोसूही तंबूत परतला अन दिल्ली संघ आणखी एका पराभवाला सामोरे जाणार हे जवळजवळ स्पष्टच झाले. (IPL 2023) अक्षर पटेलने थोडे फार अस्त्र परजवले खरे पण त्यात फारसा विश्वास वाटत नव्हता, दिवा विझण्याआधीची फडफड व्हावी तशी त्याची छोटीशी खेळी होती.आक्रमक फके5 मारण्याच्या नादात तोही बाद झाला अन दिल्ली संघाचा पराभव जास्तच स्पष्टपणे दिसू लागला.त्यानंतर त्यांच्या पराभवाची केवळ औपचारिकताच बाकी होती,अगदी तसेच झाले अन दिल्ली संघाला आपल्या निर्धारित 20 षटकात केवळ 140 धावाच करता आल्या,ज्यामुळे त्यांच्या संघाला 27 धावांनी पराभूत व्हावे लागले.

अष्टपैलू कामगिरी करून संघाच्या विजयाचा पाया रचणाऱ्या रवींद्र जडेजाला सामन्याचा मानकरी म्हणून घोषित(IPL 2023) करण्यात आले.

 

संक्षिप्त धावफलक

चेन्नई 8 बाद 167दुबे 25,गायकवाड 24,रहाणे 21,रायडू 23,जडेजा 21,धोनी 20

  • अक्षर पटेल 27/2, मार्श 18/3
    विजयी विरुद्ध
    दिल्ली कॅपिटल्स 8 बाद 140
    रोसू 35,पांडे 27,सॉल्ट 17,अक्षर पटेल 21
    दीपक चाहर 28/2,पथीराना 37/3,जडेजा 19/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.