Pimpri : अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी अप्पर तहसीलदारांची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयात (Pimpri) नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर अप्पर तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांनी अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर दंडात्मक कारवाई केली. आतापर्यंत त्यांनी एकूण 3 लाख 5 हजार 52 रुपयांची वसुली केली आहे.

अप्पर तहसीलदार कार्यालयाकडून 13 एप्रिल ते 9 मे 2023 या कालावधीत अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी आठ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यातील चार प्रकरणात तीन लाख पाच हजार 52 रुपये वसुली करण्यात आली आहे. उर्वरित 4 प्रकरणी देखील दंडात्मक रक्कम वसूल करण्याची कारवाई सुरू आहे. तसेच 9 मे 2023 रोजी चऱ्होली येथे एकूण 4 ठिकाणी अवैध उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यात आली असून पंचनाम्याची कारवाई सुरू आहे.

Pune : आर्थिक पाठबळ नसल्याने नवउद्योजकांना अपयश : डॉ. दीपक करंदीकर

डॉ. अर्चना निकम म्हणाल्या की, अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी दंडात्मक वसुली व कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. क्षेत्रीय अधिकारी तलाठी, मंडलाधिकारी यांना (Pimpri) अवैध उत्खनन वाहतुकीवर कारवाई करण्याची सूचना केली आहे.

लोकांना रॉयल्टी भरण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.