PCMC : सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी महापालिका सेवेतून कार्यमुक्त

 एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत  (PCMC) शासनाकडून प्रतिनियुक्तीने आलेले सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांचा कार्यकाळ संपल्यामुळे विनंतीनुसार त्यांना पालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी जारी केला आहे.

Pimpri : अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी अपर तहसिलदारांची कारवाई

20 फेब्रुवारी 2020 मध्ये उपजिल्हाधिकारी प्रशांत जोशी यांची महापालिकेत सहाय्यक आयुक्त या पदावर शासनाच्या नगर विकास विभागाने 1 वर्षांसाठी नियुक्ती केली होती. (PCMC) मात्र, जोशी यांना महापालिकेत येऊन तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला होता. त्यामुळे आपला महापालिका सेवेतील कार्यकाळ पूर्ण झाला असून महसूल व वन विभाग या मूळ विभागात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

याबाबत जोशी यांनी लेखी अर्जाव्दारे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे पालिका सेवेतून कार्यमुक्त करण्याची विनंती केली होती. त्यानुसार जोशी यांना बुधवारी पालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.