Chinchwad Rape Case : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज : लग्नाचे आमिष दाखवून (Chinchwad Rape Case) बलात्कार केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एकास अटक केली आहे. याबाबत 30 वर्षीय पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन पुंडे (वय 35 वर्षे, सुदर्शननगर, चिंचवड) हा आरोपी आहे.

Alandi : जागेच्या वादातून पाच जणांनी तिघांना धक्काबुकी करून दिली जीवे मारण्याची धमकी

आरोपी हा फिर्यादी यांचा मित्र होता. आरोपीने 12 ऑगस्ट 2016 ते 27 जून 2022 पर्यंत फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी त्यांची इच्छा नसतानाही आरोपीने त्याच्या राहत्या फ्लॅटवर, तीन हॉटेल व फिर्यादीच्या राहत्या घरी फिर्यादीशी बळजबरीने शरीरसंबंध केले. आरोपी विरोधात भा. द. वि. कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.