Alandi : जागेच्या वादातून पाच जणांनी तिघांना धक्काबुकी करून दिली जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज : चऱ्होली खुर्द गावात (Alandi) जमिनीच्या वादातून पाच जणांनी तीन व्यक्तींना धक्काबुक्की, शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्या पाच जणांचा शोध घेत आहेत.

या प्रकरणी सागर बोरुंदिया (वय 46 वर्षे, रा. आळंदी देवाची) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजित दुधेडिया, त्याचा मुलगा व पुतण्या आणि इतर दोन अनोळखी इसम असे एकूण 5 आरोपी आहेत. ही घटना 1 जुलै रोजी दुपारी चऱ्होली खुर्द शिवरातील आळंदी ते वडगाव रोड जाणाऱ्या रोड लगत असणाऱ्या सर्वे नं 97/अ/2/8 मधील एकूण क्षेत्र 8 आर पैकी 4 आरमध्ये घडली.

फिर्यादी आपला (Alandi) भाचा पंकज बलदोटा याच्या सांगण्यावरून आपल्या सोबत दोन ते तीन कामगार घेऊन या जागेमध्ये गेले व मुरूम टाकून सदरची जागा व्यवस्थित करत होते. त्यावेळेस तेथे एक पांढऱ्या रंगाची चार चाकी गाडी येऊन उभी राहिली व त्यातून 5 इसम खाली उतरले. त्या 5 इसमांमधील एका इसमाने म्हंटले, कि मी अजित दुधेडिया असून माझ्यासोबत माझा मुलगा व पुतण्या आहे, इतर दोन माझ्या ओळखीचेच आहेत. ही माझ्या मालकीची जागा आहे. त्यावेळी फिर्यादी याने म्हंटले, कि ही जागा माझा भाचा पंकज बालदोटा याने हिरालाल चौधरी व इतर दोघांकडून खरेदी खताने विकत घेतलेली आहे.

Pune Theft : उच्चभ्रु सोसायटीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक

फिर्यादीचे उत्तर ऐकल्यावर दुधेडिया आणि त्याच्यासोबत असलेल्या चौघांनी फिर्यादी व फिर्यादीसोबतच्या कामगारांना शिवीगाळ केली. तसेच तुमचा या जागेशी काही एक संबंध नाही, तुम्ही इथून चालते व्हा असे म्हंटले. .

फिर्यादीने समजूत काढूनही त्यांचे ऐकून घेतली नाही, उलट तुम्ही येथून नाही गेला तर तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकी दिली. तसेच तेथून जाताना दुधेडिया याने ही जागा माझीच आहे. याठिकाणी माझे सामान होते ते आता इथे दिसत नाही. मी तुझ्याविरुद्ध चोरीची केस देईन. अशी धमकी दिली. त्याच्या सोबतच्या लोकांनी सदर ठिकाणी भाजी विक्री करत असलेल्या महिलांना शिवीगाळ केली व तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहणारे आम्हाला शिकवू नका असे म्हणत लोकांची गर्दी जमा झालेली पाहून पळ काढला. आरोपींच्या विरोधात भा. द. वि. कलम 143, 147, 447, 149, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल (Alandi) करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.