Pune Theft : उच्चभ्रू सोसायटीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक

30 लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत

एमपीसी न्यूज: उच्चभ्रू सोसायटीत (Pune Theft) घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी चोरलेले 60 तोळे वजनाचे 30 लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या ह्द्दीत दि. 20 रोजी सोबा सवेरा अपार्टमेंट, येथील फिर्यादी यांच्या राहत्या घराचे कुलूप बंद असताना कोणीतरीं चोरट्यांनी फिर्य़ादी यांच्या बिल्डींगचे टेरेस लॅाक तोडून टेरेसवाटे घराच्या गॅलरीत प्रवेश केला व त्यांच्या बेडरूममधील कपाटात असलेले एकूण 60 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 1 लाख 40 हजार रूपये असे एकूण 18 लाख 76 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून या अट्टल गुन्हेगारांना पकडले आहे. (Pune Theft) मुश्तफा शकील अन्सारी, जुनेद रिझवान सैफ व हैदर कल्लु शेख अशी या आरोपींची नावे आहेत. मुश्तफा शकील अन्सारी या सराईत गुन्हेगाराला पुणे शहर गुन्हे शाखा युनिट 1 च्या टिमने पकडून बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Pimpri Corona Update: शहरात आज 118 नवीन रुग्णांची नोंद; 76 जणांना डिस्चार्ज

वरील सर्व आरोपींना तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रविण काळुखे व स्टाफने सखोल व कैाशल्यपूर्ण तपास करून अटक केले. व त्यांच्याकडून 60 तोळे वजनाचे 30 लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.