Pimpri Corona Update: शहरात आज 118 नवीन रुग्णांची नोंद; 76 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 118 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 76 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 62 हजार 812 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 239 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 182 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Pune News: पुणे विद्यापीठाचा ‘मिडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज’ विभाग देशात पहिल्या पाचमध्ये.!

तर, 57 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 952 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 58 हजार 969 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.