Pimpri : महिलेचे प्रवासादरम्यान दागिने गेले चोरीला

एमपीसी न्यूज : एका महिलेचे (Pimpri) लहान पर्स व त्यातील 1.86 लाख सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत 29 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी 2 जुलै रोजी तळवडे ते काळभोरनगर, चिंचवड मार्गे जात असताना त्यांच्या हॅन्ड बॅगची चैन उघडी राहिल्याने त्यामधील सोन्याचे दागिने असलेली लहान पर्स त्यामध्ये 60,000 रुपये किंमतीचा 2 तोळ्याचा सोन्याचा राणीहार, 1,13,000 रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण, 10,950 रुपये किंमतीच्या सोन्याची ठुशी, 2,000 रुपये किंमतीची सोन्याची नथ असे एकूण 1,86,020 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या संमती शिवाय स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेले.

Pimpri Corona Update: शहरात आज 118 नवीन रुग्णांची नोंद; 76 जणांना डिस्चार्ज

अज्ञात चोरट्या विरोधात पिंपरी पोलीस (Pimpri) ठाण्यात भा. द. वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.