Chinchwad : ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे – वसंत ठोंबरे 

एमपीसी न्यूज – जेव्हा जेव्हा आपण निरोगी जीवनशैलीचा विचार करतो ( Chinchwad ) तेव्हा नियंत्रित आणि अत्यंत पौष्टिक आहार, हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे, असे मत वसंत ठोंबरे, अध्यक्ष , फ्रेंड्स ट्रेक क्लब यांनी मांडले.
ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस समारंभ थाटात संपन्न झाला. वंदना सोहोनी,उषा तळपटे,उषा गायकवाड,रमाकांत ताटकर,मधुकर धकाते,दीपक साळुंखे, किसन गायकवाड, आशाताई राऊत आठ ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस सोहळा विरुंगळा केंद्र, ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ, महात्मा फुलेनगर चिंचवड येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी नगरसेविका योगिता नागरगोजे व युवा कार्यकर्ते सचिन सानप तसेच ज्येष्ठ नागरिक व त्यांचे कुटुंबीय याप्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वसंत ठोंबरे म्हणाले, जेव्हा जेव्हा आपण निरोगी जीवनशैलीचा विचार करतो तेव्हा नियंत्रित आणि अत्यंत पौष्टिक आहार, हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे.
तणावमुक्त जीवन, जमेल तसा व्यायाम मित्र मैत्रिणींबरोबर संवाद  फिरणे,  योगा बरोबर हास्य योग व सकारात्मक दृष्टीकोन  ही जेष्ठ नागरिकांच्या आनंदी  व निरोगी जीवन जगण्याची महत्त्वाची सूत्रे आहेत जी लोक निरोगी जीवनशैलीशी सर्वात जास्त जोडतात ती म्हणजे व्यायाम.
सातत्यपूर्ण व्यायाम हा केवळ ज्येष्ठांसाठी उर्जा पातळी आणि प्रतिकारशक्ती राखण्याचा एक मार्ग नाही तर त्यांचे संपूर्ण शरीर संतुलन सुधारतो आणि त्यांना इतर लोकांवर कमी अवलंबून राहण्यास मदत करतो,अधिक चांगली जीवनशैली मिळू शकते जी बैठी आणि अवलंबून राहण्या ऐवजी आनंद आणि ऊर्जेने भरलेली असते. हसणे आणि विनोद या दोन बाबी जेष्ठ नागरिकांना आनंदी ठेवतात.असे प्रतिपादन आपल्या मनोगत व्यक्त केले.ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ दर महिन्यात त्या महिन्यात जन्मदिवस असणा-या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मार्गदर्शक विश्वास सोहोनी यांनी केले.  शिवानंद चौगुले यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप नंतर नागरिकांनी सुरुची भोजनाचा आस्वाद ( Chinchwad ) घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.