Chinchwad : केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले विद्यार्थी

एमपीसी न्यूज- केरळमधील पुरग्रस्तांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरु आहे. आता यामध्ये शालेय विद्यार्थीसुद्धा मागे राहिलेले नाहीत. दिघी येथील आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शक्तीनुसार धान्य, बिस्किटे, नवीन कपडे देऊन सामाजिक जबाबदारी उचलली आहे.

संस्कार प्रतिष्ठान, टाटा व्हालेंटिअरिंग टाटा मोटर्स, आदर्श शिक्षण संस्था दिघी यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शालेय विद्यार्थ्यांनी केरळ मधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 15 पोती धान्य, 12 पोती नवीन कपडे तसेच पुण्यातील स्वयंसेवकांनी पारले बिस्किटचे एक हजार बॉक्स केरळ पूरग्रस्तांसाठी दिले आहेत.

या सर्व वस्तू एर्णाकुलम एक्स्प्रेसमधून पाठविण्यात आले. आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रियांका बारसे, डॉ मोहन गायकवाड आणि शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.