Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दिशा उपक्रमातील दोन खेळाडूंची राष्ट्रीय फूटबॉल स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज – गुन्हेगारी मार्गावर (Chinchwad) दिशा भरकटलेल्या बालकांसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून दिशा उपक्रम राबवला जात आहे. दिशा उपक्रमातून घडलेले फुटबॉल पटू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपले कर्तुत्व दाखवत आहेत. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिशा उपक्रमातील दोन खेळाडूंची स्लम सॉकर या राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नागपूर येथे नुकतीच राज्य स्तरीय स्लम सॉकर ही स्पर्धा पार पडली. त्यामध्ये पुणे जिल्हा मुलांच्या संघाने दुसरा तर पुणे जिल्हा मुलींच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या संघांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून राबवल्या जाणाऱ्या दिशा उपक्रमातील खेळाडूंचा देखील समावेश होता. राज्य स्तरावरील यशस्वी संघांचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी कौतुक केले.

गुरुवारी (दि. 29 फेब्रुवारी) कोलकाता येथे स्लम सॉकर ही राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ तयार करण्यात आला आहे. या संघात राज्यभरातून उत्कृष्ठ खेळाडूंचा सहभाग आहे. विशेष बाब म्हणजे या संघात पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून राबवला जात असलेल्या दिशा उपक्रमातील दोन खेळाडूंचा सहभाग आहे.

Ravet: मातृभाषा हे संवादाचे उत्कृष्ट माध्यम – प्राचार्या डॉ. बिंदू सैनी

शमशाद सिद्धिकी आणि जावीर पाशा हे दोन खेळाडू निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या (Chinchwad) फुटबॉल टीममध्ये खेळतात. त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दिशा उपक्रम यशस्वी ठरला आहे.

दिशा उपक्रमांतर्गत 18 पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 31 फुटबॉल संघ तयार करण्यात आले आहेत. संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या प्रशिक्षकांकडून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत खेळाडूंना सरावासाठी मैदान उपलब्ध करून दिले असून पोलीस अधिकाऱ्यांकडून त्या संघांवर विशेष लक्ष दिले जात आहे. क्रीडा प्रशिक्षक संदेश बोर्डे, समाजसेविका प्राजक्ता रुद्रवार यांच्यासह यशस्वी खेळाडूंचा पोलीस आयुक्त कार्यालयात सत्कार करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.