Chinchwad: मराठी राज्यभाषा दिनानिमित्त साहित्यगंध व राज्य स्तरीय आंतर शालेय मराठी अभिवाचन स्पर्धेचे बक्षीस  वितरण

एमपीसी न्यूज –  मोरया शिक्षण संस्थाचिंचवड आयोजित (Chinchwad)मराठी राज्यभाषा दिना निमित्त साहित्यगंध हा कार्यक्रम व राज्यस्तरीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेचा बक्षीस समारंभ मंगळवारी (दि.27) एल्प्रोसिटी मॉल ऑडिटोरियम येथे पार पडला.

 

“साहित्यगंध” या कार्यक्रमांतर्गत सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गीतकार मंदार चोळकर व (Chinchwad)सुप्रसिद्ध गझल गायिका श्रुती करंदीकर यांच्याशी इंद्रायणी माटे व स्नेहा कुलकर्णी यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पाकाही निवडक कवितांचे वाचन, श्रुतीचे सुश्राव्य गायन तसेच राजश्री धोंगडे या उभरत्या कथ्थक नृत्यांगनेचे सादरीकरण झाले.

Ravet: मातृभाषा हे संवादाचे उत्कृष्ट माध्यम – प्राचार्या डॉ. बिंदू सैनी

मोरया शिक्षण संस्था गेली सलग चार वर्ष आंतरशालेय राज्यस्तरीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करीत आहे. या ही वर्षी राज्यभरातून 300  स्पर्धकांनी आपला सहभाग यामध्ये नोंदविला होता. अभिवाचन स्पर्धेच्या परीक्षणाचे काम राधा रांगोळेनितीन पैलवानप्रतिभा कुलकर्णी व इंद्रायणी माटे यांनी केले.कार्यक्रमाच्या आयोजनात संजय खेडकर, भाग्यश्री पंडित, प्राची जोशी, रेखा पैलवान, विराजश्री अवचरे यांचा सहभाग होता. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश अग्रेसर यांनी केले.

 

26 जानेवारी 2024 रोजी दिल्ली येथे राजपथावर झालेल्या संचलनात प्रथम सांस्कृतिक कार्यक्रमांचा सहभाग होता.त्यामध्ये चिंचवड मधील पायल नृत्यालयाच्या नृत्यांगना ही सहभागी होत्या. या कार्यक्रमात त्यातील पायल गोखले व मानसी भागवत यांचाही सन्मान मोरया शिक्षण संस्थेतर्फे करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे स्वप्निल शेडगे व रणजीत सावंत ही उपस्थित होते.

 

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

 

गट क्र. 1: इ. 1ली ते थी: प्रथम क्रमांक –विरा विराज खैरे,रँग्लर र. पु. परांजपे प्राथ.शाळा,द्वितीय क्रमांक – मैत्रेयी सोनपेठकर, ज्ञान गंगा इंग्लिश मिडीयम स्कूल, तृतीय क्रमांक- वेदा नरेंद्र पळशीकर, हुजूर पागा पुणे,

उत्तेजनार्थ – नभा वलय मुळगुंद, नवीन मराठी शाळा,

उत्तम प्रयत्न – आश्लेषा गणेश वर्पे, PCMC स्कूल नं 54 व सारिशा आदित्य फडतरे, एम. एस. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल.

 

गट क्र. 2: इ. 5वी ते 7वी: प्रथम क्रमांक – मिरा अतुल काळे, ज्ञानप्रबोधिनी शाळा,

द्विती यक्रमांक- स्वराली विनोद झणझणेव्ही. के. माटे हायस्कूल, तृतीय क्रमांक – राधिका सोमनाथ तोडमल, गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल,

उत्तेजनार्थ- शार्दुल प्रकाश देशिंगे, व्ही. के. माटे हायस्कूल,

उत्तम प्रयत्न – मानसी महेश अकोलकर, स्वामी विवेकानंद बालविद्यामंदिर  सौमित्र संतोष देशपांडे, लॉयला हायस्कूल पाषाण.

 

गट क्र. 3: इ. 8 वी ते 10 वी: प्रथम क्रमांक – रुद्राणी जगदीश गोंडे पाटील, आयकॉन इंग्लिश स्कूल,

द्वितीय क्रमांक – वैष्णवी सिद्धेश्वर लामतुरे, व्ही. के. माटे हायस्कूल, तृतीय क्रमांक- हरक अमोल भारतीया, लॉयला हायस्कूल पाषाण,

उत्तेजनार्थ – शिवानी योगेश शिरसाठ, व्ही. के. माटे हायस्कूल,

उत्तम प्रयत्न- शेखजेबा कामरान, अँग्लोउर्दु हायस्कूल.

 

गट क्र. 4: शिक्षक  खुलागट : प्रथम क्रमांक – रँग्लर र. पु. परांजपे प्राथ. शाळा, हुजूर पागा, पुणे,

द्विती यक्रमांक: एम. एस. एस. हायस्कूल (शिक्षकगट), तृतीय क्रमांक- DIC इंग्लिश मिडीयम स्कूल,

उत्तेजनार्थ- नागेश्वर विद्यालय, पाटस(काव्यवाचन), उत्तम प्रयत्न – एम. एस. एस. ज्युनिअर कॉलेज(विद्यार्थी गट) 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.