Chinchwad : एशियन सायकलिंग चॅम्पियनशीपमध्ये प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या सिद्धी शिर्केचे उत्तुंग यश

एमपीसी न्यूज : कमला शिक्षण संस्थेच्या (Chinchwad) प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता बारावी सायन्समधील सिद्धी शिर्के हिने तिरुवनंतपुरम येथे झालेल्या मास स्टार्ट इव्हेंटमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्त्व करत पहिला क्रमांक पटकावला.

या यशासोबतच ‘एम.टी. डी. एशियन सायकलिंग चॅम्पियनशीपसाठी ती भारताचे नेतृत्त्व करणार आहे. यासाठी महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षकांनी तिला मार्गदर्शन केले.

Nigdi : चाकू, कोयत्याने वार करत तरुणाचा खून; नऊ जणांवर गुन्हा दाखल

महाविद्यालयातून संस्थेचे सचिव डॉ दीपकजी शहा, उपप्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे, क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापिका शबाना (Chinchwad) शेख, क्रीडा शिक्षक प्राध्यापक अक्षय परदेशी, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सिद्धीचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.