Nigdi : चाकू, कोयत्याने वार करत तरुणाचा खून; नऊ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरासमोर गप्पा मारत थांबलेल्या (Nigdi)  दोघांवर चाकू आणि कोयत्याने वार करत तसेच सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत हल्ला केला. यामध्ये एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. 11) सकाळी सव्वादहा वाजता जिवलग सोसायटी, बिल्डिंग नंबर सात, ओटास्कीम, निगडी येथे घडली. याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात

काळ्या उर्फ शाहिद पठाण, सुरज चंदनशिवे उर्फ डोरेमॉन, शाहनवाज शेख उर्फ शहाण्या, जावेद शेख, शाहिद शेख आणि इतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश गोरख धुनधव (वय 23) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आनंद उर्फ दाद्या राजू गवळी (वय 22) हा गंभीर जखमी झाला आहे. आनंदच्या आईने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद गवळी आणि आकाश धुनधव हे दोघेजण बुधवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास (Nigdi) घरासमोर गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तिथे आरोपी आले. आरोपींनी आनंद आणि आकाश यांना शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने दोघांच्या छातीवर, पोटावर चाकू, कोयत्याने वार केले. सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून दोघांना गंभीर जखमी केले. घटना घडल्यानंतर आरोपी पळून गेले.

Chinchwad : अश्विनी जगताप यांचा अपमान हा भाजपच्या मनुवादी मानसिकतेचे प्रतीक – ज्योती निंबाळकर

जखमी आकाश आणि आनंद यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आनंद गवळी याच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात खुनी हल्ल्याची फिर्याद दिली होती. फिर्याद दिल्यानंतर काही वेळातच आकाश धुनधव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर निगडी पोलिसांनी या गुन्ह्यात खुनाच्या गुन्ह्याची कलमवाढ केली आहे. पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.