Chinchwad : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठपनेनिमित्त उजळली होती चिंचवडमधील मंदिरे

एमपीसी न्यूज – अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठपनेनिमित्त  देशभरात (Chinchwad) दिवाळी साजरी करण्यात आली असतानाच पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध बांधकाम व रिडेव्हलपमेंट व्यवसायातील असलेल्या सिद्धीदाता ग्रुपच्या वतीने शहरातील 50 पेक्षा जास्त मंदिरात आकाश कंदिल लावत आनंद साजरा केला. आकर्षक विद्युत राेषणाई केली होती. यामुळे मंदिर आणि परिसर उजळून निघाला हाेता.

Pune : पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रामार्फत डाळिंब निर्यात करण्याची संधी

अयोध्यानगरीत मंदिर उद्घाटन आणि प्रभू श्रीरामाचा  प्राण प्रतिष्ठापणा सोहळा 22 जानेवारी राेजी पार पडला. रामलल्लाच्या लोभस बालमूर्तीची  प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते करण्यात आली. संपूर्ण देशात हा सोहळा जल्लोषात साजरा केला. या साेहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम क्षेत्रातील नामांकित असलेल्या सिद्धीदाता ग्रुपने चिंचवड व आजुबाजुच्या 50 पेक्षा जास्त मंदिर आणि परिसरात आकाश कंदिल लावून शाेभा वाढविली.

याबाबत सिद्धीदाता ग्रुपचे संचालक आदित्य शिंदे म्हणाले, प्रभू श्रीराम हे अखंड भारत देशासह जगभरातील रामभक्तांचे आराध्य दैवत आहे. अयाेध्देमध्ये श्रीरामांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना झाल्यामुळे 500 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे प्रभुंचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा दिवाळी पेक्षा महत्त्वाचा सण आहे. प्रभू श्रीरामांच्या आगमनाने मनाेमन आनंद झाला आहे. प्रभूंच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी शहरातील 50 पेक्षा जास्त मंदिर आणि परिसरात आकाशकंदील व विद्युत रोषणाई (Chinchwad)  केली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.