Pune : पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रामार्फत डाळिंब निर्यात करण्याची संधी

एमपीसी न्यूज – अमेरिकेने घातलेली निर्यात बंदी उठवल्याने (Pune) डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधेचा वापर करुन डाळींब निर्यातीची संधी असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात निर्यात करावी, असे आवाहन पणन मंडळाचे सहायक सरव्यवस्थापक सतिश वाघमोडे यांनी केले आहे.

अपेडा, भारत सरकार, एन. पी.पी.ओ., महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व के. बी.एक्सपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेत डाळींब निर्यातीचे नियोजन करण्यात आले असून पहिली शिपमेंट नुकतीच फ्लोरिडा शहरात रवाना करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली. एकूण ३३६ बॉक्सेसमधून 1 हजार 344 किलो भगव्या प्रतीचे डाळिंब हवाई मार्गे पाठविण्यात आले.

Pune : ‘सिटीझन सेंट’ उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट तर, मराठीमध्ये ‘स्थळ’ची बाजी

निर्यातीसाठीचे माईट वॉश,सोडियम हायपोक्लोराइड प्रक्रिया, वॉशिंग- ड्राईंग प्रक्रिया करुन निश्चित केलेल्या मानांकनानुसार डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करणे आवश्यक आहे. भारतीय डाळिंबामध्ये कर्करोगापासून लढण्यासाठी लागणारे अँटी (Pune) ऑक्सिडंट असल्याने अमेरिकेत डाळिंबाला असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन जास्तीत जास्त उत्पादकांनी या सुविधेचा वापर करावा, असेही वाघमोडे यांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.