Chinchwad crime News: निगडी, हिंजवडी, वाकडमधून तीन दुचाकींची चोरी

एमपीसी न्यूज – निगडी, हिंजवडी आणि वाकड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 29) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहारुख कुरशीद अहमद शेख (वय 25, रा. ट्रान्सपोर्टनगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेख यांची 20 हजारांची मोपेड दुचाकी (एमएच 14 / ईएल 2322) त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. हा प्रकार 26 ऑक्टोबर रोजी उघडकीस आला.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

तानाजी ज्ञानेश्वर मोहोळ (वय 29, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहोळ यांची 25 हजारांची मोपेड दुचाकी (एम एच 12 / एम सी 4502) महालक्ष्मी वजन काटा, राधा चौक, म्हाळुंगे येथून चोरून नेली. हा प्रकार 25 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

जगन्नाथ हरिभाऊ सिरगीरे (वय 58, रा. थेरगाव, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिरगीरे यांची 25 हजारांची मोपेड दुचाकी त्यांच्या सोसायटीच्या समोरून चोरून नेली. त्यांच्या दुचाकीला चावी राहिली असताना दुचाकी बाजूला घेण्याच्या बहाण्याने दुचाकी पळवून नेली. ही घटना 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.