Pune Crime : अनधिकृत बांधकामाला विरोध करणाऱ्या सोसायटीच्या सेक्रेटरी व महिला उपाध्यक्ष यांना मारहाण

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या आवारात सुरू असणाऱ्या अनधिकृत बांधकामाला विरोध केल्याने आठ ते नऊ जणांनी सोसायटीच्या सेक्रेटरी व महिला उपाध्यक्ष यांना मारहाण करण्यात आली आहे.

येरवडा येथील हरिगंगा सोसायटीत बुधवारी (दि.27) हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कपिल पांडे (वय 43) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हरिगंगा सोसायटीचे सेक्रेटरी असून सोसायटी मधील एक व्यक्ती सोसायटीच्या आवारात अनधिकृत बांधकाम करत होता. फिर्यादी यांनी त्याला बांधकाम करण्यास विरोध करत बांधकाम थांबविण्याची विनंती केली.

चिडलेल्या आरोपीने वाद घालण्यास सुरुवात केली. वाद सुरू झाल्यानंतर सोसायटीच्या महिला उपाध्यक्षा तिथे आल्या. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला आणि आरोपीने साथीदाराना बोलवत फिर्यादी यांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. यात महिला उपाध्यक्षा जखमी झाल्या आहेत. येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III