Pune Crime : मॅट्रीमोनी साईटवरुन लग्नाचे आमिष दाखवून महिलेची पावणे दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मॅट्रीमोनी साईटच्या माध्यमातून ओळख करून लग्नाचे आमिष दाखवून महिलेची पावणे दोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. सहा मार्च ते दहा ऑक्टोबर दरम्यान हि घटना घडली.

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांनी विवाहासाठी मॅट्रीमोनीसाईटवर नावनोंदणी केली होती. मॅट्रीमोनी साईटवरून त्यांची आरोपी सोबत ओळख झाली. आरोपीने त्यांना लग्नाचे आमिष दाखविले. त्यांच्यासोबत ओळख वाढविली.

त्यांच्यात संवाद वाढल्यानंतर आरोपीने महिलेकडून विविध कारणांसाठी 1 लाख 85 हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपीने महिलेशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दिली. वारजे पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.