Chinchwad : घरफोडी करून सव्वा दोन लाखांचे दागिन्याची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 24 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. ही घटना नोव्हेंबर 2019 ते 21 डिसेंबर 2019 या कालावधीत दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी 15 जानेवारी रोजी फिर्याद दिल्याने तीन आठवड्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहनाजअफसर अहमद हवलदार (वय 45, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) त्यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हवलदार यांचे घर नोव्हेंबर 2019 ते 21 डिसेंबर 2019 या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील लाकडी कपाटात ठेवलेले दोन लाख 24 हजार रुपये किमतीचे 75 ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. घटना घडल्यानंतर तीन आठवड्यांनी याबाबत फिर्याद देण्यात आली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.