Chinchwad : रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह दोघांना अटक; तीन पिस्टल तीन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पुणे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने (Chinchwad) चिंचवड परिसरातून रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना अटक केली. अटक केलेल्या दोघांकडून तीन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडे नगर येथे करण्यात आली.

सुनील बाळासाहेब खेंगरे (वय 38, रा. चिंचवडेनगर, चिंचवड), अभिजीत अशोक घेवारे (वय 35, रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi : पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात हातोडीने घाव

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहर परिसरात गोळीबार करून खून करण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने याबाबत कारवाई करण्याचे गुन्हे शाखांना आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार चिंचवड परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार (Chinchwad) आशिष बोटके आणि प्रदीप गोडांबे यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनील केंद्रे आणि त्याच्या साथीदाराकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलिसांनी वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडेनगर येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख 20 हजार 600 रुपये किमतीचे तीन देशी बनावटीचे पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आरोपी सुनील केंद्रे याच्यावर सन 2011 सली भोसरी पोलीस ठाण्यात दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपआयुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक निरीक्षक उद्धव खाडे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, सुनील कानगुडे, किरण काटकर, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.