Hinjawadi : पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात हातोडीने घाव

एमपीसी न्यूज – पुर्ववैमनस्यून एका 28 वर्षीय तरुणाच्या (Hinjawadi) डोक्यात हातोडीने घाव घालत गंभीर जखमी केले आहे. हि घटना बुधवारी (दि.24) सकाळी हिंजवडी येथील एका साईटवर झाली.
याप्रकरणी सुरेंदर नागेंदर पांडे (वय 32 रा. काळेवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अनिल कुमार निशाद (वय 27 रा. हिंजवडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
PCMC : शहरातील 608 होर्डिंगमालकांनी अद्यापही स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला केला नाही सादर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कामगार महम्मद युसुफ पठाण (वय 28) व आरोपी हे अटलांटा साईटवर काम करतात. आरोपी पठाण यांच्यात झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने पठाण याच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारत त्याला गंभीर जखमी केले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.